बांदा येथे रंगपंचमी उत्साहात साजरी

10

बांदा येथे रंगपंचमी उत्साहात साजरी

बांदा (मंगल कामत)दि ८ एप्रिल २०२४

होळी पौर्णिमेपासून पंधरा दिवसांनी साजरा होणारी बांद्याची रंगपंचमी रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.शिमगोत्सवाच्या पुर्वसंध्येला शनिवारी सायंकाळी पारंपारिक फेऱ्या तसेच रात्री शिमगोत्सवानिमित्त मोरुची मावशी हा नाट्यप्रयोग झाला.रविवारी
सकाळी बाजारपेठेतील श्री देव मांडकरी देवस्थान येथे शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत पारंपारिक विधी होऊन ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करण्यात आली. त्यानंतर बांद्यातील सर्वच वाड्यांमध्ये जागोजागी,घरोघरी रंगपंचमी खेळण्यात आली. ढोलताशे , झांज तर काही ठिकाणे डिजेचा वापर करत लहान मुले,युवक तसेच महीला आदींसह विविध वयोगटातील नागरीकांनी मोठ्या जल्लोषात रंगपंचमीचा आनंद लुटला.सायंकाळी वाजतगाजत रंगांची उधळण करत रोंबाट फेरी