काँग्रेसच्या जिल्हा मतदार संघनिहाय बैठका सुरू
सावंतवाडी (प्रतिनिधी)दि .७ एप्रिल २०२४
सावंतवाडी तालुका कॉग्रेसची सांगेली जिल्हा परिषद विभागीय बैठक सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या अध्यक्षतेखाली सांगेली घोलेवाडी येथे संपन्न झाली.या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक माजी जिल्हा अध्यक्ष विकास भाई सावंत , कॉग्रेसचे जेष्ठ नेते ऍड. दिलीप नार्वेकर ,सावंतवाडी शहर अध्यक्ष ऍड रघु नार्वेकर , कॉग्रेस सरचिटणीस रुपेश आईर,नंदिहली सर ,अशोक राऊळ, रविंद्र म्हापसेकर, संजय लाड या मान्यवारांच्या उपस्थित पार पडली आणी यावेळी माडखोल,कलम्बिस्त,वेर्ले, सावरवाड,दाणोली, येथील कॉग्रेस कार्येकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते दत्ताराम सावंत , बापू आईर , रामा राऊळ सरगावकर ,सोनू आईर , संतोष तेली , सचिन सावंत , मिथुन रेडीज , अशोक राऊळ , सुंदर राऊळ, काळजी राऊळ , अशोक देसाई, बाळकृष्णा रेडीज, शांताराम रेडीज , विनायक पालव, बाळकृष्णा देसाई, संतोष सावंत , सचिन राणे, मनोहर राऊळ, बंटी इलेकर, पार्वती पालव , नंदा राणे, आरती आईर, नयना पालव , जयश्री देसाई, बाया राणे,व इतर पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.या बैठकीला विकासभाई सावंत मार्गदर्शन करताना म्हणाले या देशातील लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सर्व मतभेद बाजूला करून महाविकास आघाडीचे उमेदवार श्री विनायक राऊत यांना विजयी करून या देशाचा पंतप्रधान कॉग्रेस पक्षाचा बनावा यासाठी कार्येकर्ते यांनी कामाला लागावे असे आवाहन श्री सावंत यांनी केले यावेळी अँड .दिलीप नार्वेकर यांनी कॉग्रेस कार्येकर्ते यांना मार्गदर्शन केले.





