जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इन्सुली नं ६ शाळेचे उल्लेखनीय यश
बांदा (मंगल कामत) दि ४ एप्रिल २०२४
युवा प्रतिष्ठान आयोजित सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परिक्षेत जि. प. प्राथमिक शाळा इन्सुली नं ६चे १६विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. १००℅ निकाल लागला. ६ सिल्व्हर व ३ ब्रांझ मेडल मिळवून दैदीप्यमान यश संपादन केले. सिल्व्हर मेडलधारक इयत्ता दुसरी कु. राशी ज्ञानेश्वर दळवी. कु. निधी तुषार पेडणेकर. कु. चैताली श्रीकृष्ण सावंत. इयत्ता – तिसरीत कु. अवनी दिपक नाईक. कु. अस्मिता सुनिल सावंत. इयत्ता-चौथी कु आरोही राजेंद्र पालव. बाॅंन्झ मेडलधारक इयत्ता तिसरी कु. भक्ती संजय केळूसकर. कु सिद्धार्थ लक्ष्मण नाईक. कु. दक्ष मनोज राणे. इतर सर्व मुले चांगल्या गुणांनी पास झाली. सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीम. तन्वी पालव, उपाध्यक्ष श्रीम.शुभदा दळवी , सदस्य, इन्सुली ग्रामपंचायत सदस्य श्री. स्वागत नाटेकर व श्रीम. वर्षा सावंत तसेच केंद्रप्रमुख श्री. लक्ष्मीदास ठाकूर. मुख्याध्यापक श्रीम. वर्षा गावडे. शिक्षक श्रीम मनिषा गावडे व पालकांनी मनपूर्वक अभिनंदन केले आहे.





