उमेदवारी जाहीर झाल्या शिवाय मीडिया समोर होणार नाही जाहीर व्यक्त – केंद्रीय मंत्री राणे
सिंधुदुर्ग
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी येथील माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली.यावेळी पत्रकारांनी लोकसभा उमेदवारी बाबत प्रश्न विचारला असता जो पर्यंत पक्षाकडून अधिक्रुत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत मीडिया समोर जाहीरपणे व्यक्त होणार नाही असे मत व्यक्त केले.राणे यांच्या य़ा उत्तराने उमेदवारी बाबत नेमकं काय चाललंय हा एक प्रश्न उपस्थित होत आहे.मात्र उबाठा यांचे उमेदवार विनायक राऊत यांचे नाव न घेता ७ ते ८ जणांच्या उपस्थितीत होत असलेल्या खळा बैठकीवर उपहासात्मक टिप्पणी केली.यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब,दत्ता सामंत,जिल्हा सर चिटणीस संजू परब,महेश सारंग,रेश्मा सावंत सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





