ज्यूनिअर सायंटीस्ट, प्राणी वैज्ञानीक संस्थेचे संयुक्त संशोधन ; सर्वाधिक प्रजाती आढळल्या कुणकेश्वर समुद्रकिनारी,

66

सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर 80 दुर्मिळ समुद्रिय प्रजाती

ज्यूनिअर सायंटीस्ट, प्राणी वैज्ञानीक संस्थेचे संयुक्त संशोधन ; सर्वाधिक प्रजाती आढळल्या कुणकेश्वर समुद्रकिनारी,

देवगड प्रतिनिधी दिनांक १६ मार्च २०२४

ज्यूनिअर सायंटीस्ट, देवगड आणि भारतीय प्राणी वैज्ञानीक संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेला कोकण कोस्टल मॅपिंग या संशोधनात्मक प्रकल्पा अंतर्गत प्राणीशास्त्र विषयाचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी
देवगड मालवण आणि वेंगुर्लेमध्ये सर्वेक्षण करून सुमारे ८० दुर्मिळ समुद्रीय प्रजातींची नोंद केली आहे.यातील
कुणकेश्वर किनारपट्टीवर सर्वाधिक ४० प्रजाती, मिठमुंबरी मध्ये मालवण मध्ये 13 तर वेंगुर्लेमध्ये ३ प्रजाती सापडल्या आहेत.या प्रजातींचे संशोधन पेपरही विद्यार्थी व प्राध्यापकांनी लिहून पूर्ण केले . या संशोधनामुळे
मिठमुंबरी व कुणकेश्वर या दोन्ही किनारपट्टी दुर्मिळ समुद्रीय प्रजातीचा बायो diversity hotspot ठरला आहे.

ऑक्टोबर २०२३ पासून सर्वेक्षण

कोकण हा नेहमी सर्व समृद्धतेने नटलेला प्रदेश असल्यामुळे इथे सागर संपदा पण तेवढीच आहे. त्यामुळे ते विविधता आढळून येते. कोकण कोस्टल. टर मॅपिंग या संपूर्ण संबोधनात्मक प्रकल्पांतर्गत ऑक्टोंबर 2023 सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. या संशोधनात सहभागी झालेल्या प्राणीशास्त्र विषयाच्या विद्यार्थी व प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. दुर्मिळ प्रजाती कशा हाताळाव्यात ? प्रजाती कशा ओळखाव्यात या विषयात या प्रशिक्षणात विशेष भर देण्यात आला होता. प्रकल्प प्रमुख म्हणून परशुराम भाऊ कॉलेज पुण्याचे राहुल सारंग ,प्रकल्प सहाय्यक म्हणून इंग्लिश मीडियम देवगडचे प्रज्वल बोरकर ,मोड हायस्कूलचा जतीन कोयंडे, संशोधक मित्र म्हणून शिरगाव हायस्कूलची माहि साटम, कळसुलकर हायस्कूल सावंतवाडीचे अंतरा तानवडे, गगन लेले, वैभवी बांदेलकर, पार्थ सावंत भाग्यम धुरी, मयुरेश सावंत हे सहभागी झाले होते.या सर्व विद्यार्थ्यांना विशेष ट्रेनिंग देण्यात आले होते यावेळी मालवणचे जीव विशेष तज्ञ श्री केणी, परशुराम भाऊ प्राणिशास्त्रप्रमुख डॉ श्रीमती जाधव यांचे सहकार्य लाभले.

सततची मासेमारी प्रजातीवर संकट सततची होणारी मासे मर्या प्रजातीवर मोठे संकट निर्माण करत आहेत मात्र यातील काही प्रजातीय लुक्त होण्याच्या मार्गावर आहेत या प्रजाती शोधताना सुट्टीचा वेळ बघून काम करावे लागते यातील खूप प्रजाती खडकाळ भागात राहणे प्रसन्न करतात त्यामुळे त्यांचे शोध घेणे अवघड होते पण स्थानिक मच्छीमारांची यात खूप मोठी मदत लाभली

या सर्वेक्षणात Lamprometra palamata नावाची अतिशय दुर्मिळ तत्सम प्रजाती सापडली. dotila myctiroides नावाचा दुर्मिळ खेकडा देखील सापडला.हे सर्व करत असताना काही प्रजातीचे ठिकाण सुरक्षित करण्यात आले .काही असुरक्षित प्रजातींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

जागृरुकतेसाठी प्रजातीचे प्रदर्शन

सर्वेक्षण दरम्यान आढळलेल्या काही प्रजातींचे प्रदर्शन १३ जानेवारी रोजी वसुंधरा विज्ञान केंद्र येथे भरविण्यात येत भरविण्यात आले होते. याच सोबत प्राणीशास्त्र जागरुकतेवर सत्रदेखील झाले. यात आठ शाळा तीन कॉलेज यांनी सहभाग नोंदविला होता. लोकांमध्ये या दुर्मिळ सागर संपत्तीबद्दल जागरुकता व्हावी .या प्रदर्शनाचा मुख्य होत आहे .या प्रदर्शनात वसुंधरा विज्ञान केंद्राचे प्रमुख नाईक यांची मदत लाभली. यातील अनेक प्रजाती प्राणी वैज्ञानिक संस्था पुणे येथे पुढील अभ्यासासाठी पाठविण्यात आल्या आहेत.
या प्रकल्पात कोणत्याही जीवाची हानी झालेली नाही, जीवांचे विशेष निरीक्षण हे त्यांच्या मूळ अस्तित्वातच केले आहे. यात कोणत्याही दुर्मिळ जीवास मारण्यात आलेले नाही .उलट गटाच्यावतीने त्यांचे संरक्षण व्हावे यावर भर दिला आहे.

सर्वेक्षण का महत्वाचे ?

दुर्मिळ समुद्रीय प्रजातीच्या सर्वेक्षणामुळे दुर्मिळ होणाऱ्या प्रजातींबद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध होते .जेणेकरून लुप्त होणाऱ्या प्रजाती वाचविणे शक्य होते .शिवाय लुप्त होणाऱ्या प्रजाती मागील सखोल कारणे शोधणे शक्य होते. शक्य असल्यास या प्रजातीस सुरक्षित ठिकाणी हलविता येते. त्यामुळे किमान त्या प्रजाती वाचू शकतील व पुढील संशोधनामुळे पुन्हा सर्वेक्षण करावे लागत नाही.