कासार्डे काथ्या उद्योगास माजी आमदार प्रमोद जठार यांची भेट
कणकवली (तुळशीदास कुडतरकर)दि ९ मार्च २०२४
कासार्डे येथे सिंधुभूमी महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरु असलेल्या काथ्या व्यवसाय प्रशिक्षणाला भाजप नेते माजी आमदार व, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी सुरू असलेल्या उपक्रमाची सविस्तर माहिती जाणून घेतली व यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी महिला उत्कर्ष संघाच्या अध्यक्षा मानसी वाळवे उपस्थित होत्या.





