कुणकेश्वर यात्रेसाठी सिंधुदुर्ग एसटी प्रशासन सज्ज

67

कुणकेश्वर यात्रेसाठी सिंधुदुर्ग एसटी प्रशासन सज्ज

विविध भागातून ७३ जादा गाड्या सोडण्यात येणार

कणकवली दि ७ मार्च २०२४( तुळशीदास कुडतरकर)

 

कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी रा. प.महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाने नियोजन केले आहे. त्यानुसार कणकवली, देवगड, मालवण व विजयदुर्ग या आगारातून एकूण 73 बस फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.

मालवण आगारातून 18 बसेस सोडण्यात येणार असून सोडण्यात येणाऱ्या बसेसमध्ये मालवण – कुणकेश्वर सात बसेस, हिर्लेवाडी – बौद्धवाडी – कुणकेश्वर, भगवंतगड व मसुरे – बांदिवडे – त्रिंबक – आचारा तिठा – कुणकेश्वर, तोंडवली – वायंगणी – कुणकेश्वर प्रत्येकी एक, आडबंदर मुणगे हिंदळे मिठबांव – कातवण – कुणकेश्वर चार बसेस, तांबळडेग – कुणकेश्वर दोन बसेस, मोर्वे कुणकेश्वर दोन बसेस अशा बसेस मालवण आगारातून सोडण्यात येणार आहेत.

कणकवली आगारातून 25 बसेस सोडण्यात येणार असून कणकवली – कुणकेश्वर वीस बसेस, फोंडा कुणकेश्वर चार बसेस, वैभववाडी – नांदगाव – कुणकेश्वर एक बस असे नियोजन करण्यात आले आहे.:

देवगड आगारातून 25 बसेस सोडण्यात येणार असून देवगड कुणकेश्वर दहा, किंजवडे – डोबवाडी – कुणकेश्वर एक, पोयरे खुडीपाट – नारिंग्रे – कुणकेश्वर (व्हाया मुसलमान वाडी आयनलवाडी एक, टेलिवाडी ताम्हाणेत्तर – वानिवडे – कुणकेश्वर एक, मिठमुंबरी – इलयेसडा – दाभोळ पूल – कुणकेश्वर दोन, नाद ओंबळ – कुणकेश्वर एक, शिरवली – कुणकेश्वर एक, रेंबवली साळशी – चाफेड – भरणी कुणकेश्वर एक, ।मोडतर – टेंबवली कुणकेश्वर एक, वळीवंडे – तोरसोळे कुणकेश्वर एक, बागतळवडे तळेबाजार – कुणकेश्वर एक, आयनल कोळोशी – कुणकेश्वर दोन, टेंबवली – तेलिवाडी – कुणकेश्वर एक, खुडी – कोटकामते – मठ बुद्रुक – बुधवळे – सांडवे एक तर विजयदुर्ग आगारातून विजयदुर्ग – जामसंडे – कुणकेश्वर पाच अशा बसेस चे नियोजन करण्यात आले आहे. कुणकेश्वर यात्रेसाठी तयार केलेल्या एसटी आगारांमध्ये नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत. या गाड्यांमधून नियमित सवलतही प्रवाशांना मिळणार आहे. एसटीच्या या सेवेचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक
अभिजित पाटील यांनी केले आहे.

सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले व विजयदुर्ग या आगारांनी त्यांच्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या महाशिवरात्री यात्रा त्यांच्या आगार पातळीवर करावयाच्या असून सदर दिवशी शालेय व सार्वजनिक सुट्टी असल्याने नियोजन करून यात्रा पार पाडावयच्या आहेत. अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत. तर मेढा + हिरण्यकेशी ( 3+3), खानोली (05), नेरुर (03), हुमरमळा ( 01 ), रामेश्वर/ विमलेश्वर (01), राहाटेश्वर (गडीताम्हाणे – 01), कुंभवडे (01), येथेही यात्रोत्सवासाठी जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.