केंद्र सरकारची योजना ही गावांचा सर्वांगीण विकास करणारी -आमदार नितेश राणे

46

वागदे येथे होणारे ग्रामसचिवलाय हे जिल्ह्यातील पाहिले ग्रामसचिवलाय

केंद्र सरकारची योजना ही गावांचा सर्वांगीण विकास करणारी -आमदार नितेश राणे

कणकवली(तुळशीदास कुडतरकर)दि ५ मार्च २०२४

 

सत्तेचे विकेंद्रीकरण करत असताना त्या – त्या ग्रामपंचायतींना त्या -त्या पद्धतीचे अधिकार मिळले पाहिजेत. म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायत बळकटीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहेत. ग्रामसचिवालयना अशा पद्धतीची इमारत देणे आणि सर्व प्रकारची विविध कार्यालय एकाच ठिकाणी, एका छताखाली आणण, अशा पद्धतीची प्रभावी अशी योजना पंतप्रधानांच्या माध्यमातून येथे आणलेली आहे. आम्हाला अभिमान वाटतो की जिल्ह्यातील ही पहिली योजना वागदे गावामध्ये सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांच्या टीमच्या सहकार्याने होत आहे. मुळात हे ग्रामसचिवलाय म्हणण्यापेक्षा मिनी मंत्रालय म्हटल्यास हरकत नाही असेही आमदार नितेश राणे म्हणाले.

केंद्र सरकारच्या नमो – ११ अभियान अंतर्गत कणकवली तालुक्यातील वागदे ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी भाजप पदाधिकारी संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, महेश गुरव, संदीप मेस्त्री, जिल्हा बँक संचालक समीर सावंत, माजी जि. प. सभापती सायली सावंत, वागदे सरपंच संदीप सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,ग्रामसेवक युवराज बोराडे, सहाय्यक ग्रामविकास अधिकारी सूर्यकांत वारंग, उपसरपंच शामल गावडे, तलाठी मंगेश जाधव, सर्कल अधिकारी मनीषा बोडके, पोलीस पाटील सुनील कदम, बबली राणे, आरोग्यसेवक गंगाधर पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ग्रामसचिवालयाच्या माध्यमातून लोकांना एकाच छताखाली विविध कार्यालयांचा उपभोग घेता येणार आहे. त्यामुळे लोकांची होणारी धावपळ व ताण कमी होणार आहे.त्यांचा घर ते सचिवालय दरम्यानचा खर्च देखील वाचेल आणि त्यांचे काम देखील प्रभावी होईल. म्हणून या सगळ्यांच्या प्रयत्नाने गावाचा विकास करणे हे त्या सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना अजून सोयीस्कर होईल. त्या दृष्टीने ही योजना केंद्र सरकारची प्रभावी योजना असून सर्वांगीण विकास करणारी आहे. असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले. यावेळी संतोष कानडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सरपंच संदीप सावंत यांनी प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निलेश पवार यांनी केले.

नवीन ग्रामसचिवलायात सर्व कार्यालये समाविष्ट!

वागदे येथे नव्याने होणाऱ्या ग्रामसचिवलयात तलाठी, मंडल कार्यालय, ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस, ग्रामसंघ कार्यालय, एम. एस. ई.बी ऑफिस, एटीएम अशी कार्यालय असणार आहेत. याचा येथील नागरिकांना मोठा फायदा देखील होणार आहे. लवकरच हे नव्याने होणारे ग्रामसचिवलाय उभे राहणार.