लिंगडाळ गाव येथे ट्रक व दुचाकी मध्ये जोरदार अपघात ; दोन जण जखमी
देवगड (प्रतिनिधी) दि ४ मार्च २०२४
देवगड तालुक्यातील लिंगडाळ गाव येथे ट्रक व दुचाकी मध्ये जोरदार धडक बसल्याने अपघात झाला. या झालेल्या अपघातामध्ये दोन जण गंभीर असून एक व्यक्ती किरकोळ जखमी आहे. सदरचा अपघात सकाळी अंदाजे १०:३० ते ११ वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी स्वार
आपल्या कलम बागायत येथे कामाच्या ठिकाणी जात असताना ट्रक व दुचाकी यामध्ये झालेल्या अपघातामध्ये दुचाकी वरील दीप भिसे व निर्मल भिसे हे दोन जण गंभीर असून एकाच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे. तर गंभीर असलेल्या दुचाकीस्वाराला उपचारासाठी ग्रामस्थांनी देवगड ग्रामीण रुग्णालयात तात्काळ हलविले. देवगड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून ओरोस येथे हलविण्यात आल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच देवगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय केसरकर, वाहतूक पोलीस विशाल वैजल, फकृद्दीन आगा ,तसेच स्थानिक ग्रामस्थांनी अधिक उपचारासाठी अपघातग्रस्तांना पुढे
हलवण्यास सहकार्य केले आहे. मात्र अपघाताचे कारण अद्यापही समजू शकले नाही अधिक तपास देवगड पोलीस
करत आहे.







