विलवडे मळावाडी येथील विष्णु दळवी यांचे निधन
बांदा : प्रतिनिधी
विलवडे मळावाडी येथील विष्णु विश्राम दळवी (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले.गिरणी कामगार म्हणून त्यांनी बरीच वर्षे काम केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, सुन,विवाहित बहीण, जावई, भाऊ,पुतणे,नातवंडे असा मोठा परिवार आहे. युवा शेतकरी गुणाजी उर्फ काका दळवी यांचे वडील होय. माजी तंटामुक्ती अध्यक्ष नंदकिशोर दळवी यांचे काका होय.





