सावंतवाडीत ” थोडे द्या, खूप मदत करा ” अन्नदान शिबिर संपन्न…!

सावंतवाडी : प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘ स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल ‘ सावंतवाडी, बांदा व कुडाळ तसेच ‘ वाव किड्स रायन प्री स्कूल ‘ सावंतवाडी, शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर यांनी ‘ माऊली कर्णबधिर मतिमंद विद्यालय ‘ कोंडूरे व वेद पाठशाळा, सावंतवाडी येथे  ” थोडे द्या, खूप मदत करा “ असे अन्नदान शिबिराचे आयोजन केले होते. तरी बऱ्याच पालकांनी किराणा वस्तूंचे दान करण्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

या अन्नदान शिबिराच्या निमित्ताने पालकांनी तांदूळ- १६० किलो, गहू – १०० किलो, साखर – ४५ किलो, पोहे – ३५ किलो, कडधान्य – ४० किलो, गोडतेल – २० लिटर, बिस्कीट पुडे – १०० नग, रवा – ५ किलो, गहू पीठ – ३५ किलो, डाळ – ८ किलो, मीठ – ५ किलो, कोलगेट – १० नग, नारळ – ५ नग हे खाद्यपदार्थ देऊ केले. व संस्थेतर्फे आयोजित केलेल्या या शिबिराद्वारे मोठ्या प्रमाणात अन्नदान करून मोलाचे सहकार्य केले.