सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेसाठी भाजपकडून नारायण राणे यांचे नाव निश्चित?

134

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेसाठी भाजपकडून नारायण राणे यांचे नाव निश्चित?

नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात लोकसभेची लढत..

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाची घोषणा केल्याची माहिती समोर येत आहे. नारायण राणे यांचा नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये सामना रंगताना पाहायला मिळणार आहे. गेले दहा वर्ष सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेकडून विनायक राऊत खासदार आहेत. त्यामुळे 2024 च्या या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्व सिंधुदुर्ग रत्नागिरी वाशीयांच लक्ष लागून राहिला आहे.

आधीपासूनच सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघामध्ये भाजपने शत प्रतिशत दावा केला होता.आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेची जागा आम्हाला मिळावी असे मत भाजपच्या नेत्यांचं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे कार्यकर्ते काम करत आहेत असं सांगितलं जातं आहे.सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवत आहेत.

2024 या निवडणुकीमध्ये इच्छुकांची बरीच नावे समोर येत होती.भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार हे गेल्या वर्षभरापासून लोकसभा मतदारसंघात काम करतायत.भाजपचा आपण कार्यकर्ता आहोत अशा आश्याने आणि पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोचवत होते .तर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा लोकसभा मतदारसंघात काम आणि दांडगा जण संपर्क आहे.आणि राजकीय विश्लेषनाच्या बाबत आमच्या जो अन्याय झालंय त्याच मतं परिवर्तन मतदारांच्या मतातून मला मिळवायचं आहे.जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मिळवु.अशी भूमिका खासदार विनायक राऊत यांची आहे.शिवसेना सोडून शिंदे सेनेमध्ये गेलेले असले तरी त्या नेत्याबरोबर कार्यकर्त्यांची फळी गेलेली नाही.अर्थात या सगळ्या बाजूने विचार केला तरी चिन्हाचा फटका कुठेतरी मतं कमी करण्यास होऊ शकतो.या लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये” चिन्ह “हे महत्त्वाच धरलं जात.आणि कार्यकर्त्यांची फळी कितीही मजबूत असली तरी तळागळातील मतदारांपर्यत नवीन” चिन्ह” पोचवण थोडं फार कठीण असल्यामुळे थोडी फार मतांमध्ये घट होईल.

सिंधुदुर्गाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण किंवा केंद्रीय मंत्री नारायण राणे या दोघांची चाचपणी करणं आणि त्यातून रिजेट मिळवणं अर्थात ही भाजपची खेळी होती.ती भाजपची खेळी नारायण राणे यांच्या माध्यमातून यशस्वी झाल्याची पाहायला मिळत आहे.त्यामुळे लोकसभेची उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उमेदवारी स्वीकारली तर भाजपची पूर्ण यंत्रणा किबवना महायुतीची पूर्ण यंत्रणा काम करेल.त्याचप्रमाणे नारायण राणे यांची स्वतःची यंत्रणा आहे ती त्यांच्यासाठी काम करेल.त्यामुळे त्यांना निवडून येण्याची शक्यता फार दाट आहे.