संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त असलदे ते कोळोशी बाजारपेठ पर्यंत राबविली स्वच्छ्ता मोहीम

168

संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त असलदे ते कोळोशी बाजारपेठ पर्यंत राबविली स्वच्छ्ता मोहीम

दिविजा वृद्धाश्रम व शिवप्रतिष्ठान मंडळ कोळोशी यांच्या संयुक्त उपक्रम

देवगड (स्वप्नील लोके) दि २३ फेब्रु. २४

 

संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन स्वस्तिक फाउंडेशन संचलित, असलदे दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबा व कर्मचारी वर्ग व शिवप्रतिष्ठान कोळोशी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ्ता मोहीम राबवण्यात आली.

शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी ही स्वच्छता मोहीम दिविजा वृद्धाश्रम असलदे ते कोळोशी बाजारपेठ पर्यंत जाणारा मार्ग परिसरात साफ सफाई केली. तसेच स्वच्छता असे जेथे , आरोग्य वसे तेथे, व ,माझा गाव स्वच्छ गाव .असे घोषणा देत समाजाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

संस्थेचे सेक्रेटरी श्री संदेश शेट्ये यांचा मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम कार्यक्रम करण्यात आला..समाजातील लोकांना स्वच्छतेचे महत्व कळावे या उद्देशाने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबा व कर्मचारी व शिवप्रतिष्ठान कोळोशी मंडळ यांच्या सहकार्यामुळे परिसरातील प्लॅस्टिक कचरा व प्लॅस्टिक बॉटल उचलून या कचऱ्याची योग्यत्या प्रकारे विल्हेवाट लावली गेली.

या कार्यक्रमासाठी दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबा व कर्मचारी वर्ग तसेच शिवप्रतिष्ठान कोळोशी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.