छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज – राजेंद्र पेडणेकर
माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळ, यांच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा
कणकवली ( प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते.छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे.
शिवरायांची निती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचे संघर्ष या सर्व बाबी बारकाईने समजावून शिवशाही अंमलांत आणणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन माऊली मित्र मंडळ कणकवली चे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी केले.
माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळ, यांच्या वतीने कणकवली भाजी मार्केट येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी राजेंद्र पेडणेकर बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते साजीद कुडाळकर, सामाजिक कार्यकर्ते विलास गुडेकर यांच्या हस्ते शिव प्रतिमेला पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करण्यात आली,
यावेळी पेडणेकर यांच्या सर्व मंडळांचे पदाधिकारी, सदस्य अविनाश गावडे ,भगवान कासले ,प्रसाद उगवेकर, सईद नाईक, जमिल कुरैशी, नुरूभाई, प्रसाद पाताडे आदी उपस्थित होते.





