कणकवली : नगरपंचायतच्या माध्यमातून कणकवली मराठा मंडळ नजीक असलेल्या स्मशानभूमीच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसवल्यानंतर आतापर्यंत या विद्युत दाहिनीवर आठ मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे लाकडाची मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे. स्मशानभूमीत मृतदेह आणल्यानंतर अंत्यसंस्कार होईपर्यंत थांबण्याकरिता नागरिकांसाठी गॅलरी टाईप बैठक व्यवस्था व त्यावर शेड देखील करण्यात आली. जेणेकरून पावसाळ्यात, उन्हाळ्यात स्मशानात येणाऱ्या लोकांना थांबण्याकरिता व्यवस्था होणार आहे. तसेच या स्मशानभूमी परिसराचे सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे.
दरम्यान सुशोभीकरण कामाची पाहणी करताना नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, ऍड. विराज भोसले, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, ठेकेदार अनिल पवार आदि उपस्थित होते.





