बांदा गणेश नगर येथे गणेश जयंती सोहळा उत्साहात

82

बांदा गणेश नगर येथे गणेश जयंती सोहळा उत्साहात

बांदा
– बांदा वाफोली मार्गावर गणेश नगर बांदा येथिल श्री अष्टसिद्धी गणेश मंदिरात माघी  गणेश जयंती सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. यानिमित्त संपुर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यंदा श्री गणरायाच्या मागे लावलेली अयोध्येतील श्रीरामलल्लाची प्रतिमा सर्वांचा भक्तीभाव द्विगुणित करणारी ठरली.

पहाटे मंगलमय वातावरणात काकडआरती ,अभिषेक व पुजा होऊन दर्शनास आरंभ झाला. त्यानंतर श्री सत्यविनायक महापुजा,दुपारी 12 वाजता श्री गणेश जन्म सोहळा ,महाआरती होऊन महाप्रसादास आरंभ झाला.सायंकाळी भजन तसेच रात्रौ  अष्टविनायक पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ निरवडे यांचा “हा खेळ संचिताचा” या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन तसेच महाप्रसादाचा  लाभ घेतला.श्री गणेश मंदिर सेवा समितीच्या वतीने या सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.