बांदा श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात गणेश जयंती

63

बांदा श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात गणेश जयंती

बांदा (मंगल कामत)

बांदा येथिल श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात
मंगळवारी  रोजी माघी गणेश जयंती
उत्सवानिमित्त श्री गणरायाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी होती.
मंगळवारी पहाटे काकड आरतीने या सोहळ्याचा आरंभ झाला. सकाळी श्री गणेश पुजा अभिषेक ,श्री सत्यनारायण महापूजा झाली.दुपारी महाआरती होऊन महाप्रसादास आरंभ झाला. सायंकाळी भजन, सायंआरती
तसेच रात्रौ श्री देव हेळेकर दशावतार नाट्यमंडळ, कारिवडे  यांचा “पर्णकेतू पर्णिका” या  नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.

यंदा या सोहळ्यानिमित्त दोन दिवस कार्यक्रम आयोजित केले असुन बुधवारी जादुचे प्रयोग व खैळ पैठणीचा हे कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवारी हजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.श्री पिंपळेश्वर गणपती मंडळ बांदा च्या वतीने या सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.