राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा सकाळी 09 नंतरच भरवल्या जाणार
सावंतवाडी – ,(प्रतिनिधी)दि ८ फेब्रु २०२४
राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा सकाळी 09 नंतरच भरवल्या जाणार असून नऊच्या आधी शाळा भरवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक सरकारने जारी केले आहे. राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा आता सकाळी ९ नंतरच भरणार आहेत. पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ वाजल्यानंतर भरवण्याचे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे.





