थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढल्याने आंबा काजू पीक धोक्यात ; तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करण्याची मागणी

151

थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढल्याने आंबा काजू पीक धोक्यात ; तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करण्याची मागणी

आंबा बागायतदारांनी दिले तहसीलदार व तालुका कृषी कार्यालयाला निवेदन

देवगड (प्रतिनिधी)

तालुक्यातील आंबा काजू पिकांची सध्या दयनीय अवस्था झाली असून मोठ्या प्रमाणात ट्रिपचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. एकीकडे कर्ज काढून महागडी औषधे वापरले जातात मात्र त्यात ट्रिपचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी मिटाकोटीस आला आहे. अलीकडे झालेल्या पावसामुळे आंबा पिकाचे नुकसानही आंबा काजू पिकाचे नुकसानही झाले आहे याचे सर्व या पिकांचे सर्वेक्षण करून तातडीचे पंचनामे करण्यात यावेत यासाठी तालुक्यातील बागायतदारांच्या वतीने आंबा बागायतदार ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड तहसीलदार रमेश पवार व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले .

या निवेदनात म्हटले आहे की,
सध्या तालुक्यातील आंबा,काजू पिकाची दयनीय अवस्था झाली आहे. झाडांना आलेल्या मोहोरावर फुलकिडीचा (थ्रीप्स) प्रादुर्भाव वाढला आहे. याच्या नियंत्रणासाठी महागडी औषध फवारणी करूनही त्याला
आळा बसत नसल्याने देवगड तालुक्यातील शेतकरी हवालदील झाले आहेत. त्यामुळे यंदा अजून आंबा उत्पादनाचा पत्ता नाही. आणि फवारणीवर होणारा वाढीव खर्च यामुळे बागायतदार आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. अलीकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे देवगड तालुक्यातील आंबा,काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर आंबा, काजू कलमे मोहोरण्यास सुरूवात झाली होती. मात्र मोहोरावर मोठ्या प्रमाणात फुलकिडीचा (थ्रीप्स) ॲटॅक वाढला आहे. फुलकिडीच्या नियंत्रणासाठी महागडी औषध फवारणी करूनही अपेक्षित फरक दिसत नाही. त्यामुळे आंबा बागायतदार पुरते हैराण झाले आहेत. यासाठी झालेल्या आंबा, काजू, पीकाच्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण होण्याची आवश्यकता आहे. यामुळे कृषि विभागाला तातडीने संभाव्य नुकनीचे पंचनामे करण्यास सांगुन त्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करण्यास सांगावे.

त्यामुळे आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळू शकेल. तातडीने कृषि विभागाकडून सर्वेक्षण अहवाल
मागविण्यात यावा अशी तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांची मागणी आहे. आशयाचे निवेदन देवगड तालुका कृषी कार्यालय व देवगड तालुका तहसील कार्यालय यांना तालुक्यातील आंबा बागायतदारांच्या वतीने ज्येष्ठ नेते नंदूशेठ घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी आंबाबागायतदार प्रकाश गुरव, शरद शिंदे, चंद्रकांत पाळेकर, शामकांत शेटगे ,बाबू वाळके, जयराम कदम, ज्ञानदेव भडसाळे, संतोष पारकर, शांताराम गायक‌वाड, मंगेश पेडणेकर, निलेश पेडणेकर, दिवाकर परब,उदय रूमडे,दिपक आचरेकर,
श्री सुदेश मुंबरकर, नागेश आचरेकर,अनिल घाडी आदी उपस्थित होते.