अनाथ वृद्ध सुमती वेंगुर्लेकर यांना सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांनी जिव्हाळा सेवाश्रमामध्ये केले दाखल.

181

अनाथ वृद्ध सुमती वेंगुर्लेकर यांना सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांनी जिव्हाळा सेवाश्रमामध्ये केले दाखल.

बांदा (प्रतिनिधी)दि ८ फेब्रु २०२४

केळुस कालीबंदर येथील सुमती सखाराम वेंगुर्लेकर या अनाथ वृद्ध महिलेला सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांनी कुडाळ पिंगुळी माडयाचीवाडी येथील श्री. सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या जिव्हाळा सेवाश्रमामध्ये नुकतेच दाखल केले आहे .

सुमती वेंगुर्लेकर यांचे बिबवणे येथे लग्न करून देण्यात आले होते. परंतु लग्नाच्या 6 महिन्या नंतर पतीने नांदवले नसल्याने त्या केळूस कालवीबंदर येथे आपल्या माहेरीच राहत होत्या आता वृद्धापकाळामध्ये त्यांना कोणताच आधार नसल्याने सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांनी त्यांना जिव्हाळा सेवाश्रमामध्ये दाखल केले आहे.
योगेश तांडेल यांनी यापूर्वी देखील वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी बागायतवाडी येथील पार्वती शंकर कुर्ले या अनाथ वृद्ध महिलेला कुडाळ पणदूर येथील सविता आश्रमात दाखल केले होते.