युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना केलेली अटक चुकीची ; जिल्हा युवक  काँग्रेसने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

61
युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना केलेली अटक चुकीची ; जिल्हा युवक  काँग्रेसने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
 देवगड (प्रतिनिधी) दि ७ फेब्रु २०२४
              युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना केलेली अटक चुकीची असून आम्ही या अटकेला विरोध करत आहोत. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने  जिल्हाधिकारी यांना बुधवारी निवेदन देण्यात आले.
            या निवेदनात म्हंटले आहे की,
 सिंधुदुर्ग जिल्हा युवक कॉंग्रेसच्या वतीने आपणास निवेदनास कारण की, आमच्या पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष. कुणाल राऊत यांना नागपूर पोलिसांनी आंदोलनाच्या नावाखाली अटक केली आहे.
  देशामध्ये सध्या चाललेल्या हुकुमशाही विरोधात व भ्रष्टाचाराविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे.भाजप सरकार जनतेच्या पैशावर जाहिरातींमार्फत आपल्या पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे. या जाहिरातींमध्ये
भारत सरकार ऐवजी मोदी सरकार असा उल्लेख होत आहे. या संदर्भात आमच्या पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष
श्री. कुणाल राऊत यांना नागपूर जिल्हा परिषदे समोरील एका जाहीरात बोर्डवर मोदी सरकारचा उल्लेख असलेल्या ठिकाणी भारत सरकार असा स्टिकर लावून सर्व सामान्य जनतेतील असलेला संताप व्यक्त केला.तेव्हा हुकुमशाही भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी पोलिस यंत्रणेचा गैरवापर करून त्यांना अटक केली.सरकारने अनैतीक, बेकायदेशीर, असंविधानीक केलेली अटक तानाशाही स्वरुपाची आहे. या सर्व गोष्टींना
आमचा विरोध आहे. या निवेदनाद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा युवक कॉंग्रेसचा आवाज आपल्या मार्फत शासनापर्यंत पोहोचवावा. अशा आशयाचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या कडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
        यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव सिद्धेश परब, कणकवली तालुकाध्यक्ष अनिकेत दहिबावकर, देवगड तालुकाध्यक्ष सुरज घाडी, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष विशाल गावडे ,प्रथमेश शिरोडकर अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.