सिंधुदुर्ग : श्री. देवी भराडी देवीच्या देव दर्शनानिमित्त मुख्यमंत्री व राज्याचे सर्वच मंत्री आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहेत. असे असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मालवण येथील निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वागत केले.

या स्वागता दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आम. कालिदास कोळंबकर, खास. डॉ. श्रीकांत शिंदे, आम. रवींद्र फाटक यांच्यासह माजी खास. निलेश राणे, दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, दीपक पाटकर, अशोक तोडणकर, आबा हडकर, पाटकर, आशिष हडकर, ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, भाई मांजरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.





