बंड्या मांजरेकर मित्र मंडळच्यावतीने नाधवडेत बैलगाडा शर्यतीचे आयोजन…!

वैभववाडी : तालुक्यात गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर कोरोनाचे सर्व नियम पाळून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदा वैभववाडी येथील नाधवडे येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. याही वर्षी बंड्या मांजरेकर मित्र मंडळ नाधवडे यांच्यावतीने भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन ५ फेब्रुवारी ला सकाळी १० वा. नाधवडे येथे एम आय डी सी च्या रिक्त जागेवर करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, कणकवली – देवगड – वैभववाडीचे आम. नितेश राणे, माजी आ. प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

बैलगाडा स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३५,००० व चषक, द्वितीय पारितोषिक २५,००० व चषक, तृतीय पारितोषिक १५,००० व चषक, चतुर्थ पारितोषिक १०,००० व चषक, पाचवे पारितोषिक ५,००० व चषक तर उत्कृष्ट चालकास – २००० रुपयाचे पारितोषिक व उत्कृष्ट बैलजोडीस – २००० रुपयाचे पारितोषिक अशी पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

राज्यभरातील अनेक ठिकाणांहून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले असून पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडणार आहे. या बैलगाडा शर्यत स्पर्धेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहील आहे.