अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रमोद परब याला २० वर्षे कारावास

594

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रमोद परब याला २० वर्षे कारावास

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी

एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्यावर मातृत्व लादल्या प्रकरणी प्रमोद मधुकर परब 52 रा. पडवे याला दोषी ठरवत जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सानिका जोशी यांनी 20 वर्षे सश्रम कारावास आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.

कुडाळ तालुक्यातील पडवे येथील प्रमोद परब याने एका अल्पवयीन मुलीच्या घरातील माणसे कामाला गेल्याने ती घरात एकटीच असल्याचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला होता. 12 मार्च 2021 आणि 16 एप्रिल 2021 अशी दोन वेळा ही घटना घडली होती. दोन महिन्यानंतर केलेल्या वैद्यकीय तपासणीत ही मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले होते. 4 मे 2021 रोजी
याबाबतची तक्रार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आली होती. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्या प्रकरणी पोलिसांनी प्रमोद परब याच्यावर भादवी कलम 376 (1), ३७६(२) (एफ )(जे)(एन) , ३७६(३) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६,८,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा व सत्र न्यायालय त दाखल झालेल्या या प्रकरणाच्या दोषारोप पत्रानुसार चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये ४ शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश होता. न्यायालयासमोर आलेल्या साक्षीदारांच्या पुराव्यानुसार न्यायालयाने दाखल सर्व कलमान्वये संशयित आरोपीला दोषी धरले. तर दाखल करण्यात आलेल्या कलमांपैकी सर्वात जास्त शिक्षेची तरतुद असलेल्या ३७६(३) या कलमान्वये आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास , २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या संपूर्ण प्रकरण चा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील यांनी केला होता. तर पैरवी अधिकारी पोलीस उप निरिक्षक जयराम पाटील. हेड कॉन्स्टेबल श्रीमती वेंगुर्लेकर, कॉन्स्टेबल अनिता कोळी यांचे सरकारी पक्षाला मोलाचे सहकार्य लाभले.

अतिरिक्त सरकारी वकील गजानन तोडकरी
पीडितेला न्याय मिळवून देण्यात यशस्वी झालो याचा आपल्याला आनंद असल्याची प्रतिक्रिया अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील गजानन तोडकारी यांनी दिली. सरकारची बाजू नेहमीच भक्कमतेने न्यायालय समोर मांडण्याचा आपला प्रयत्न असतो. २०२३ मध्ये ११ गुन्ह्यातील आरोपींना शिक्षेला पोचवले होते. दरम्यान या गुन्ह्यातही आरोपीला शिक्षा झाल्याने न्यायालयाने पुन्हा एकदा चुकीला माफी नसल्याचा संदेश समाजाला दिला आहे असे सांगितले.