महाराष्ट्रातील ११ गड किल्ल्यांच्या युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव सिंधुदुर्गातील सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश

11

महाराष्ट्रातील ११ गड किल्ल्यांच्या युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव सिंधुदुर्गातील सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश

मुंबई

महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याच्या युनेस्कोच्या २०२४-२५ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठविला आहे. याबद्दल आनंद व्यक्त करतानाचं या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्यावर अंतिम मोहरही उमटेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणारा छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम गड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले गेले . अनेक शतके ताठ मानेने उभे असलेल्या या गड किल्ल्यांवर ऐतिहासिक वारसाची मोहर उमटवण्याचा प्रयत्न सुरू आहे .याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड ,खांदेरी ,रायगड राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, व सिंधुदुर्ग या ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची यादी मध्ये नामांकनसाठी पाठविण्यात आला आहे .