उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या कारणासाठी घेतली माजी आमदार प्रमोद जठार यांनी घेतली भेट
देवगड (प्रतिनिधी)
कोकणातील काजू बी हमीभावाच्या प्रश्न लवकरच सुटणार असून यासंदर्भात माजी आमदार तथा प्रमोद जठार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली . मंत्रालयात आपले अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे जठार त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचेकडे केली आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व कोल्हापूर जिल्हयातील कोकणाशी संबंधीत भागात काजूचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जाते.परंतू, दुर्दैवाने काजू “बी” ला राज्य सरकारने हमीभाव ठरवून दिलेला नाही.काजूच्या दरामध्ये दरवर्षी अस्थिरता असल्याने व्यापारी कमी दराने काजू खरेदी करतात. त्यामुळे काजू बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत.
श्री. प्रमोद जठार यांनी केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेंतर्गत काजू “बी” ला प्रति किलो रुपये २०० हमीभाव किंवा अनुदान मिळण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करणेबाबत आपल्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात यावी. तसेच सदर बैठकीस मलाही आमंत्रित करण्यात यावे, अशा मागणीचे पत्र जठार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.





