सोनुर्ली ग्रामस्थांच्या लढयाला यश ;नियमांचे उल्लंघन करणारे क्रशर व्यवसाय बंद करण्याचे दिले आदेश
सावंतवाडी – प्रतिनिधी
सोनुर्ली गावाच्या हद्दीत नियमांचे उल्लंघन करुन क्रशर उत्खनन व क्रशींग करून शेतकरी व ग्रामस्थांचे अतोनात नुकसान होत असल्याने सदर क्रशर तात्काळ बंद करण्यासाठी दीपक नाईक व ग्रामस्थांनी पुकारलेल्या 26 जानेवारी रोजी उपोषण यश आले असून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बेकायदेशीर रित्या क्रशर व्यवसाय करणाऱ्या दोन क्रशर पैकी एक प्रश्न तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले असून एका क्रशरला क्रशर बंद करण्यासाठी सात दिवसाचा अवधी दिला आहे.
सोनुर्ली,वेत्ये,निगुडे परिसरात मोठ्या प्रमाणात क्रशर व्यवसाय चालतो.सदरचा क्रशर हा खरोखरच नियमानात चालवले जातात का?याबद्दल वारंवार ग्रामस्थांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.क्रशरची धूळ व क्रशर मध्ये होणारे ब्लास्टिंग यामुळे लोकांच्या घरांना तडे गेले असून फार मोठ्या प्रमाणात बागायतीचेही नुकसान झाले आहे.वारंवार शासकीय यंत्रणेकडे याबाबत तक्रारी करूनही कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई न झाल्याने अखेर सोनुर्ली गावातील दीपक नाईक व ग्रामस्थांनी काल प्रजासत्ताक दिनी सोनुर्ली ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषण छेडले.यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ कडून बेकायदेशीर रीत्या क्रशर व्यवसाय करणाऱ्या एक क्रशर तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले असून दुसऱ्या क्रशर व्यवसायिकाला त्याची क्रशर बंद करण्यासाठी सात दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे.यामुळे या कारवाईमुळे उपोषणकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून क्रशर विरोधात आपला लढा याही पुढे सुरू राहील असे उपोषणकर्त्यानी सांगितले.
यावेळी दिपक नाईक,संदिप गांवकर,तेजस गांवकर,नकुल गांवकर,दिलीप गांवकर ,अजित महाडिक,विनोद ठाकुर, संदिप गाड,धोंडिराम गांवकर,संदेश जाधव,बाबा जाधव, अनिल गांवकर,संदेश मडुरकर,नरेश मोर्ये,आशिष गवस,मामा गावडे सरस्वती धूरी,सुजाता धडाम,सोमनाथ गोसावी आदी उपोषण वेळी उपस्थित होते.





