कोटकामतेतील कारसेवक कै.मुकुंद भटकामतेकर यांच्या कारसेवेबद्दल झाला सम्मान
कणकवली(प्रतिनिधी)
१९९२ सालच्या अयोध्यातील राम मंदिर संदर्भातील अविष्मरणीय लढ्यात कोटकामते गावचे नेतृत्व केलेल्या व ज्यांची कार सेवक म्हणून नेमणूक झालेले देवगड तालुक्यातील कोटकामते गावचे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, मिराशी मानकरी आणि माजी सरपंच कै. मुकुंद भटकामतेकर (काका )आपल्या गावाच्या वतीने सहभागी झाले होते. त्यांच्या सेवेबद्दल त्यांचा मुलगा केदार ( विक्की ) भटकामतेकर यांचा सन्मान कणकवली येथील कार सेवक सन्मान सोहळा कार्यक्रमादरम्यान कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. नितेश राणे यांनी यांच्या हस्ते कणकवली येथे करण्यात आला. यावेळी 1992 च्या अविस्मरणीय लढ्यातील कार सेवक उपस्थित होते.





