कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार अजय नाणेरकर यांच्या बागेतील देवगड हापुसची पेटी वाशी मार्केटला रवाना
देवगड/प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर चांदेलवाडी येथील आंबा बागायतदार अजय सुधाकर नाणेरकर यांच्या बागेतील पहिली देवगड हापूस आंबा पाच डझनची पेटी वाशी मार्केट येथील उ. ना . नवले यांना मुहूर्ताची पहिली पेटी पाठवून आपल्या यावर्षीच्या देवगड हापूस आंबा पिक व्यवसायाची सुरुवात केली .






