रोटरी क्लब ऑफ़ मॅंगो सिटी देवगड आयोजित एस टी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद

87

रोटरी क्लब ऑफ़ मॅंगो सिटी देवगड आयोजित एस टी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद

देवगड (प्रतिनिधी)

रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि तालुका आरोग्य विभाग देवगड ह्यांच्या सहकार्याने आज ग्रामीण रुग्णालय देवगड येथे एस टी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले.ह्या शिबिराचा 78 एस टी चालक, वाहक तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.सदर कार्यक्रम प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ उमेश पाटील, रो डॉ विद्याधर तायशेटे ,एस टी देवगड स्थानक प्रमुख श्री सैतवडेकर तसेच रोटरी क्लब देवगड चे प्रेसिडेन्ट प्रविण पोकळे, चार्टर्ड प्रेसिडेंट हनीफ मेमन, सेक्रेटरी विजय बांदिवडेकर, खजिनदार अनिल कोरगावकर ,रो दयानंद पाटील, रो अनुश्री पारकर, रो मनस्वी घारे, रो मनीषा डामरी ,रो नरेश डामरी ,रो सुनील पारकर, रो गौरव पारकर, रो अनिल गांधी उपस्थित होते.शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ कदम तसेच अन्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.