कोकणात उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात येऊ दे, आणि कोकण समृद्ध होऊ दे माजी आमदार प्रमोद जठार यांचे सिद्धिविनायक चरणी साकडे

80

कोकणात उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात येऊ दे, आणि कोकण समृद्ध होऊ दे माजी आमदार प्रमोद जठार यांचे सिद्धिविनायक चरणी साकडे

कणकवली (प्रतिनिधी)

माझ्या कोकणात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येऊ देत, माझे कोकण आणि कोकणी माणूस आर्थिक संपन्न समृद्ध होऊ दे ,कोकणातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देत, असे साकडे भाजपचे माजी आमदार तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी प्रभादेवी मुंबई येथील सिद्धिविनायक चरणी घातले.
मुंबई प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात आज मंगळवारी पत्नी नीरजा जठार, चिरंजीव अभिषेक जठार यांच्या सह दर्शन घेतले. यावेळी डामरे सरपंच बबलू सावंत, सुनील खाडये उपस्थित होते .