महाराष्ट्र माझा दिनदर्शिका २०२४ चे सावंतवाडीत दिमाखत प्रकाशन

289

महाराष्ट्र माझा दिनदर्शिका २०२४ चे सावंतवाडीत दिमाखत प्रकाशन

सावंतवाडी (प्रतिनिधी)

महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनलने आपली एकवर्षाची वाटचाल यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.याचं एक वर्षपूर्तीचे औचित्य साधून आम्ही महाराष्ट्र माझा डिजिटल न्युज चॅनलचा प्रथम वर्धापनदिना निमित्त प्रकाशित केलेल्या महाराष्ट्र माझा २०२४ या दिनदर्शिकेचे प्रकाशन सावंतवाडी राजवाडा राणीसाहेब सत्वशिला शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते सोमवार १५ जानेवारी २०२४ रोजी सावंतवाडी राजवाडा येथे प्रकाशित करण्यात आले.यावेळी राणीसाहेब यांनी आपल्या चॅनलच्या नावाने सुंदर अशी दिनदर्शिका आपण प्रकाशित केली असल्याचे सांगत महाराष्ट्र माझा टीमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत संचालक हेमंत मराठे व जिल्हा प्रतिनिधी मंगल कामत यांचे विशेष कौतुक केले.
तत्पूर्वी श्री देव पाटेकर, श्री देव उपरलकर यांच्या चरणी महाराष्ट्र माझा डिजिटल न्युज चॅनलच्या वतीने काढण्यात आलेल्या महाराष्ट्र माझा दिनदर्शिका २०२४ अर्पण करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी डॉ महादेव परब,सौ पार्वती परब, महाराष्ट्र माझा डिजिटल न्युज चॅनलचे संचालक तथा संपादक हेमंत मराठे, उपसंपादक स्वप्नील लोके, जिल्हा प्रतिनिधी मंगल कामत, आदीसह महाराष्ट्र माझा टीम उपस्थित होती.