मडूरा व्ही.एन नाबर प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
बांदा (मंगल कामत)
श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मडूरा व्ही.एन नाबर प्रशालेत 22 वा स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सिंधुदुर्ग जिल्हा बँक चे संचालक श्री. विद्याधरजी परब व किनळे गावचे सरपंच आणि बीजेपी अध्यक्ष संघटना सावंतवाडी,श्री दीपक नाईक, मडूरा गावचे सरपंच श्री उदय सा बा शेठ चिंदरकर,लोकल कमिटी चेअरमन श्री भिकाजी धुरी, श्री. शशिकांत पित्रे सर व भाऊ वळंजू,पी टी ए उपाध्यक्षा सानिका गावडे व श्री कृष्णा गावडे उपसरपंच मडुरा पंचायत , लोकल समिती सदस्य श्री सुरेश गावडे व श्री प्रकाश वालावलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व सर्व समिती सदस्य यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत गायन करून पाहुण्यांचे स्वागत केले .कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका सौ नीती साळगावकर यांनी स्नेहसंमेलनाचा आढावा सादर केला. त्यानंतर सहशिक्षिका कुमारी तेजस्वी गावडे यांनी 2023 व 24 चे अहवाल वाचन केले. मुलांनी केलेल्या हस्तलिखिताचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले.कुमार यशवंत परब याने हस्तलिखिताचे प्रास्ताविक केले. चालू वर्ष 2023 व 24 मधील ठळक घडामोडीचे पीपीटी द्वारे सादर करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.कला सादर करून पालक व ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमांमध्ये लोकनृत्य,कोळी नृत्य,पथनाट्य, भाषणे, गायन,नाटक व असे अनेक नृत्यांचे प्रकार सादर केले. सर्व शिक्षक वृंदांनी अतिशय मेहनत घेतल्यामुळे खूप सुंदर असे परफॉर्मन्स झाले. या कार्यक्रमास मुख्याध्यापिका सर्व शिक्षक पालक,ग्रामस्थ, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सहशिक्षिका वेलांकनी रोड्रिक्स तर आभार सहशिक्षिका प्रतीक्षा शिरोडकर व प्राची परब यांनी मानले.









