जामसंडेत राममंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने राम भक्तांच्या वतीने निमंत्रण अक्षता कलश यात्रा

325

जामसंडेत राममंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने राम भक्तांच्या वतीने निमंत्रण अक्षता कलश यात्रा

देवगड (स्वप्नील लोके) ९ जानेवारी २०२४

संपूर्ण जगाचे लक्ष अयोध्यानगरीतील राम जन्मभूमीवर साकारणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाकडे आहे. दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचे मंदिराचे मंदिराच्या उद्घाटनाचा अभूतपूर्व सोहळा रंगणार आहे.

रामजन्मभूमी मंदिर उद्‌घाटन सोहळ्याच्या निमित्ताने जामसंडे येथील सर्व रामभक्तांच्यावतीने निमंत्रण अक्षता कलश यात्रा जामसंडे बाजारपेठ ते दिर्बादेवी मंदिर अशी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी समस्त रामभक्त हिंदू माता भगिनी मोठ्या संख्येने या अक्षता कलश मिरवणुकीत रामभक्त सहभागी झाले होते. यात विशेष म्हणजे स्वतः माजी आमदार ॲड अजित गोगटे ढोल वादन करत या यात्रेत रममान झालेले पहायला मिळाले .