जगातलं सर्वात मोठं जहाज; टायटॅनिकपेक्षा पाचपट मोठं, लांबी आयफेल टॉवरपेक्षा जास्त

18

जगातलं सर्वात मोठं जहाज; टायटॅनिकपेक्षा पाचपट मोठं, लांबी आयफेल टॉवरपेक्षा जास्त

दिल्ली : टायटॅनिक जहाजापेक्षा पाच पट मोठं असलेलं रॉयल कॅरेबियन शिप २७ जानेवारी २०२४ ला व्यावसायिक प्रवासाला जाण्यासाठी सज्ज झालं आहे. समुद्र सफरीला निघताच हे जहाज जगातलं सर्वात मोठं क्रूझ जहाज ठरेल.

या भल्यामोठ्या जहाजात मोठ्या वॉटरपार्कसह अनेक सुविधा आहेत. आयकॉन ऑफ द सीज आणि वंडर ऑफ द सीज असंही या जहाजाला म्हटलं जात आहे.

जहाजाची क्षमता ५ हजार प्रवाशांची आहे. त्याचा आकार एका लहान शहराएवढा आहे. जगातील सर्वात मोठं समुद्री वॉटरपार्क असून त्याचं नाव कॅटेगरी ६ असं ठेवलं आहे. यात रेकॉर्ड ब्रेकिंग व़ॉटर स्लाइड आहे.समुद्रात सर्वात वेगवान असलेल्या एपिक नियर व्हर्टिकल ड्रॉप्स, फर्स्ट फॅमिली राफ्ट स्लाइड यांचाही समावेश आहे. जहाजावर सात पूल आणि नऊ व्हर्लपूलसुद्धा असणार आहेत.

समुद्र सफर आणि अलिशान क्रूझमधून जाण्याची इच्छा असलेल्यांसाठी या क्रूझवर अनेक सोयीसुविधा असणार आहेत. ३६५ मीटर लांबी असलेल्या जहाजाचं वजन अडीच लाख टन आहे. टायटॅनिक जहाजाचं वजन ५० हजार टन इतकं होतं. तर लांबी आयफेल टॉवरपेक्षाही जास्त आहे.

जहाज इतकं मोठं आहे की त्यात २० डेक आहेत. लोक रात्री आणि दिवसा आरामात जहाजावर एन्जॉय करू शकतात. या क्रूजवर एक एक्वापार्क, स्नॅकबार आणि लाउंजरही आहे. याशिवाय स्कायवॉकही असून लोकांना समुद्राच्या वर फिरत असल्याचं वाटेल.