आमदार अपात्रतेचा निकाल देणार नवी राजकीय दिशा; बुधवारी अंतिम निर्णय

23

आमदार अपात्रतेचा निकाल देणार नवी राजकीय दिशा; बुधवारी अंतिम निर्णय

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात २२ जून २०२२ नंतर झालेल्या उलथापालथीनंतर न्यायालयीन लढाई आणि विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी अशा तब्बल दीड वर्ष चाललेल्या शिवसेना प्रकरणावर बुधवारी अंतिम निकाल येणार आहे.

निकाल कोणत्या गटाच्या बाजूने लागतो यावर सरकारचे भवितव्य ठरणार आहे.
निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर राज्य सरकारच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. मात्र, हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला तर सरकारला निर्धोकपणे आपला कार्यकाळ पूर्ण करून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जाता येईल.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पक्ष कुणाचा आणि आमदार अपात्रतेचा मुद्दा आल्याने ते न्यायालयीन लवादाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांना निष्पक्षपातीपणे निकाल द्यावा लागणार आहे. सुमारे चार महिने चाललेल्या मॅरेथाॅन सुनावणीनंतर हा निकाल लागेल.