चंदन धुरी यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्यपदी निवड
सावंतवाडी – (हेमंत मराठे) ८ जानेवारी २०२४
सावंतवाडी तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या समिती सदस्यपदी कोलगांव येथील सामाजिक कार्यकर्ते साबाजी देऊ तथा चंदन धुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड करण्यात आली असून याबाबतचे मा. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे नियुक्तीपत्र त्यांना सादर करण्यात आले आहे. गजानन नाटेकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत चंदन धुरी यांच्यासह शंकर उर्फ बाळू साळगांवकर, प्रांजल जाधव, शिवानी पाटकर, महादेव पांगम, संजय देसाई, विनोद सावंत, सत्तार पटेल यांचाही समावेश आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारसीनुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे. चंदन धुरी यांच्या या निवडीबाबत त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.





