झाराप पत्रादेवी महामार्गावरील बेकायदेशीर डिव्हायडर तोडले त्यांच्यावर कारवाई करा; इन्सुली माजी सरपंच रवींद्र केळकर यांची मागणी
सावंतवाडी (प्रतिनिधी)
झाराप ते पत्रा देवी महामार्गावर अनेक ठिकाणी बेकायदेशीर रित्या डिव्हायडर फोडून रस्ता करण्यात आलेला आहे .त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. हे दुभाजक ज्याने फोडले त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी इन्सुलीचे माजी उपसरपंच रवींद्र केळकर यांनी केली आहे. अन्यथा येत्या 26 जानेवारी रोजी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग ६६ यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे.
घरात ते पत्रा देवी क्रमांक सहाच्या महामार्गावर ठिकठिकाणी रस्ते दुभाजक फोडून प्रत्येक व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायाला मार्ग केला आहे तसेच रस्त्यालगत असलेल्या व्यवसायामुळे वाहन तळ काढण्यात आले आहेत वाहन तळावरून वाहन बाहेर काढताना महामार्गावर मोठ्या प्रमाणात माती दगड येऊन अपघात वाढत आहे सदर रस्त्यावर रस्ते दुभाजक किती ठिकाणी फोडावे असे आपल्या आराखड्यात आहे याची संख्या कळवावी व ज्यांनी त्यावर अतिक्रमण करून आपल्या व्यवसायासाठी दुभाजक फोडले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलेले आहे अन्यथा आपण 26 जानेवारी रोजी आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असे निवेदन चिंचोली माजी उपसरपंच ग्रामपंचायत चिंचोली रवींद्र रामा केरकर यांनी कार्यकारी अभियंत सावंतवाडी यांना दिलेले आहे





