फोंडाघाट कुर्ली नवी वसाहत येथे शटरचे सामान चोरीस

36

फोंडाघाट कुर्ली नवी वसाहत येथे शटरचे सामान चोरीस

कणकवली (प्रतिनिधी)

नवी कुर्ली वसाहत तेथील एकनाथ नारायण चव्हाण यांच्या यांनी दुकानाचे नवीन शटर लावण्यासाठी आणलेले दहा हजार रुपयांचे साहित्य अज्ञाताने चोरून नेले. या प्रकरणी एकनाथ चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या दरम्यान घडली.
उपलब्ध माहिती नुसार फोंडाघाट कुर्ली नवी वसाहत येथील एकनाथ चव्हाण यांनी कोल्हापूर येथून दुकानाला बसविण्यासाठी शटलचे साहित्य आणले होते. त्यांनी हे साहित्य घराच्या बाजूला दुकानासमोर ठेवले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी साहित्य चोरून नेले या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रवी शेडगे करत आहेत.