आताच्या विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिकता चांगली – नारायण आडकर
मुणगे भगवती हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
देवगड (स्वप्नील लोके)
पूर्वीच्या विद्यार्थ्यांपेक्षा आताच्या विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिकता चांगली आहे हे आजच्या विज्ञान प्रदर्शन, गणित प्रदर्शन ,चित्रकला प्रदर्शन या प्रदर्शनावरून दिसून येतंय. असे प्रतिपादन संस्थेचे कार्याध्यक्ष नारायण आडकर यांनी केले.ते श्री भगवती हायस्कूल व स्वर्गीय विना सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होकेशन कोर्स मुणगेच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमादरम्यान अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
श्री भगवती हायस्कूल व स्वर्गीय विना सुरेश बांदेकर ज्युनियर कॉलेज ऑफ व्होकेशन कोर्स मुणगेच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम मुणगे प्रशालेच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी सुरेश ठाकूर, सुनील पारकर, शालेय समिती अध्यक्ष निलेश परूळेकर, सरपंच अंजली सावंत,मुख्याध्यापिका श्रीमती- कुंज मँडम, धर्माजी आडकर, वसंत गुरव, संजय बांबुळकर, शरयु घाडी,भरत सावंत. वसंत शेट्ये, संदिप घाडी, प्रमोद सावंत, दशरथ मुणगेकर, विश्वास मुणगेकर,सिताराम मुणगेकर सौ अश्विनी मेस्त्री, ओंकार पाध्ये.सुनील सावंत , रमाकांत सावंत, रघुनाथ मेस्त्री, सुरबा सावंत, विजय मुणगेकर, अंकिता मुणगेकर, मनिषा खानोलकर, कामीनी परब, मनिष शेट्ये,बुध्दिसागर मुणगेकर, बाळकृष्ण बागवे,अनिल धुवाळी , प्रणव पुजारे ,बाळा बोरकर, सागर आईर,स्वप्निल लोके, झुंजार पेडणेकर,पालक वर्ग व शिक्षकवृद आदी उपस्थित होते.
प्रमाणिक पणे व्यवसाय करून भगवती हायस्कूलचा विद्यार्थी असल्याचा आदर्श निर्माण करा देवी भगवती
या हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक ह.सू. चिलेचा आदर्श ठेवा तरचं उद्याचा भारत घडविणारे विद्यार्थी मुणगे हायस्कूल मधूनच पुढे येतील. ५५ पेक्षा जास्त मुलं दत्तक घेणारे हे मी पाहिलेले जिल्हातील पहिलं हायस्कूल मुणगे आहे.आचरा जरी माझे मूळ गाव असले तरी मुणगे हेचं माझे माहेर असल्याचे मत यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुरेश ठाकुर यांनी व्यक्त केले.
जीवनात हारजित होत असते , त्यामुळे हार झाल्याने वाईट वाटून न घेता जोमाने सक्रिय व्हा.केवळ बौद्धिक क्षेत्रातचं नाव मिळू शकेल असा गैरसमज करून घेऊ नका.कला, क्रीडा क्षेत्रांतही प्रचंड व्याप्ती असल्याने त्यातही भविष्य धडू शकते. आयुष्याचे फाउंडेशन हे हायस्कूलमध्ये तयार होते. यासाठी अपार मेहनती करावी लागते म्हणून ध्येय निश्चित करा. असे प्रतिपादन यावेळी माजी सभापती सुनील पारकर यांनी केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शन, गणित प्रदर्शन, चित्रकला व रांगोळी प्रदर्शन या आर्ट गॅलरीचे उद्घाटन तसेच प्रशालेने तयार केलेला अंतरंग या हस्तलिखिताचे प्रकाशन देखील करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन – गौरी तवटे, प्रसाद बागवे यांनी केलं तर
प्रस्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती कुंज मँडम यांनी तर उपस्थित मान्यवरांचे आभार सौ. रश्मी कुमठेकर यांनी व्यक्त केले.





