देवगड उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्या वतीने संजय धुरी यांना श्रद्धांजली

78

देवगड उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्या वतीने संजय धुरी यांना श्रद्धांजली

देवगड (प्रतिनिधी)

उमाबाई बर्वे लायब्ररी देवगड या संस्थेचे सचिव आणि स्नेहसंवर्धक मंडळ देवगडचे अध्यक्ष श्री संजय भालचंद्र धुरी यांचे दुःखद निधन झाले . त्यांना ग्रंथालय व स्नेहसंवर्धक मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री सागर कर्णिक यांनी संजय धूरी हे देवगडच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व होते. तसेच ते निवेदक होते म्हणून ते सर्वांच्या स्मरणात राहतील असे सांगितले.तर स्नेहसंवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष श्री चारुदत्त सोमण यांनी संजय धुरी यांचे देवगडच्या कला सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या जाण्याने या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
यावेळी ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा सौ उत्तरा जोशी, संचालक सदस्य श्री एस एस पाटील, दत्तात्रय जोशी, स्नेहसंवर्धक मंडळाचे सदस्य अँड अभिषेक गोगटे, तसेच कवी प्रमोद जोशी, प्रसाद मोंडकर डॉ भाई बांदकर, लिलाधर जामदार आदी उपस्थित होते.