बांदा मराठा समाज व आस्था लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने शुगर तपासणी व रक्त तपासणी शिबिर

107

बांदा मराठा समाज व आस्था लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने शुगर तपासणी व रक्त तपासणी शिबिर

बांदा (मंगल कामत)

बांदा मराठा समाज व आस्था लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त तपासणी शिबिर व
शुगर तपासणी शिबिर दिनांक 29 व 30 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते साडेबारा वाजेपर्यंत मातृत्व मेडिकल स्टोअर्स, काळसेवाडी,बांदा पोस्ट ऑफिस जवळ, जुना मुंबई गोवा हायवे रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर सर्वांसाठी मोफत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये डॉ.चेतना गावकर होमिओपॅथिक हे रुग्णांना मार्गदर्शन व सल्ला देणार आहेत.
सदर शिबिरात रक्त एस.सीबीसी ११ टेस्ट
हिमोग्लोबिन,तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी प्लेटलेट
रक्तातील साखरेचे प्रमाण वजन
उंची,बी.एम.आय
ब्लड प्रेशर तपासणी करून रुग्णांना डॉक्टर मार्फत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे रक्त तपासणी मध्ये तांबड्या पेशी,पांढऱ्या पेशी, प्लेटलेट, शुगर तपासणी, त्यांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
बांदा मराठा समाजामार्फत गेली आठ वर्ष अनेक नवनवीन उपक्रम घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सर्व रुग्णांसाठी अशा प्रकारचे मोफत तपासणी शिबिर प्रथमच आयोजित करण्यात आले आहे. सदरच्या शिबिराचा बांदा परिसरातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन बांदा मराठा समाज अध्यक्ष श्री विराज परब व सचिव आनंद वसकर यांनी केले आहे.