आसामच्या तेजपूरमध्ये भूकंपाचे धक्के; ३.४ तीव्रतेची नोंद
आसाम
आसामच्या तेजपूर येथे आज (दि.२७) पहाटे ५:५३ वाजता ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती दिली. भूकंपाचे केंद्र तेजपूर येथे होते.
या भूकंपाच्या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. दरम्यान, मणिपूरमधील चुराचंदपूरजवळ ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.





