निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे,रुग्णांचे हाल. रुग्णांच्या नातेवाईक व ग्रामस्थांचा आंदोलन छेडण्याचा इशारा

331

निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे,रुग्णांचे हाल.
रुग्णांच्या नातेवाईक व ग्रामस्थांचा आंदोलन छेडण्याचा इशारा

सावंतवाडी (प्रतिनिधी)

निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमणूक असलेले दोन्ही डॉक्टर रविवारी गैरहजर असल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांला माघारी परतावे लागले.विशेष म्हणजे राठोड नामक एका समुदाय आरोग्य अधिकाऱ्याला ओपीडीची जबाबदारी दिल्याचाही धक्कादायक प्रकार निदर्शनास आल्याने रुग्णांच्या नातेवाईकानी नाराजी व्यक्त केली आहे.
तळवडे येथील प्रगतशील शेतकरी उत्तम परब यांची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी रविवारी सकाळी नऊ वाजता विकास गावडे यांच्यासह भूषण पेडणेकर शंकर सावंत सुशांत गावडे हे निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले परंतु त्या ठिकाणी गेल्यावर आरोग्य केंद्राची जबाबदारी असलेले डॉक्टर विक्रम मस्के आणि सौ लंबे त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते. तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली असता दोघेही बाहेर गेल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान त्या ठिकाणी राठोड म्हणून असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याने पण तपासणी करतो असे सांगून उत्तम परब यांना औषधे लिहून दिली.मात्र संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांची त्यांनी चौकशी केली असता आपण मित्र म्हणून या ठिकाणी आलो आहे असे त्यांनी सांगितले. एखादा आरोग्य कर्मचारी अशा प्रकारे रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे लिहून देतो हे धक्कादायक असल्याने विकास गावडे यांच्यासह सोबत असलेल्यांनी आरोग्य यंत्रणेला फोनाफोनी सुरू केली. एवढ्यात त्या ठिकाणी डिसिल्व्हा नामक महिला डॉक्टर येऊन उत्तम परब यांची तपासणी केली. यावेळी मला फोन आल्याने आपण या ठिकाणी तपासणीसाठी आले आहे असे मॅडम नी सांगितले. एकूणच हा सगळा प्रकार लक्षात घेता चुकीचा असल्याने निष्काळजी आरोग्य यंत्रणेमुळे एखाद्याचा जीवसुद्धा जाऊ शकतो अशी नाराजी गावडे यांनी व्यक्त केली. रविवार असला तरी संबंधित डॉक्टरांनी येथे हजर असणे गरजेचे आहे.रविवारी नऊ ते बारा या वेळेत तब्बल दहा ते बारा पेशंट परतुन गेले.याला जबाबदार कोण त्यामुळे संबंधितावर चौकशांती योग्य ती कारवाई झालीच पाहिजे अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सोबत घेऊन याबाबत आवाज उठवू. प्रसंगी आंदोलनही छेडू असा इशारा त्यांनी दिला.
रविवारी सकाळी निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना मिळालेल्या वागणुकीबद्दल जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा रुग्णाच्या नातेवाईकांनी दिला आहे.याबाबत आता प्रशासन कोणती भूमिका कडे घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.