दुर्गमावळा प्रतिष्ठान तर्फे या ठिकाणी राबविली स्वच्छता मोहीम !

66

दुर्गमावळा प्रतिष्ठान तर्फे या ठिकाणी राबविली स्वच्छता मोहीम !

बांदा (मंगल कामत)

सोळाव्या शतकातील आदिलशाही राजवटीतील इतिहासाची साक्ष देणाऱ्या येथील रेडे घुमटची साफसफाई मोहीम आज दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे राबविण्यात आली. आज दिवसभर कित्येक टन कचरा गोळा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात घुमटावर वाढलेल्या जंगली झाडाझुडपाची तोड करण्यात आली. घुमटाची संवर्धन मोहीम राबविण्यात आल्याने या ऐतिहासिक वास्तूला नवीन झळाळी प्राप्त झाली आहे.
यावर्षीच्या सुरुवातीला जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत या घुमटाची संवर्धन मोहीम राबविण्यात आली होती. या संवर्धन मोहिमेत झुडपांनी अदृश्य झालेल्या रेडे घुमटाने मोकळा श्वास घेतला. पावसात पुन्हा एकदा घुमटाच्या आजूबाजूला झाडी वाढलेली होती. आज दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे आयोजित मोहिमेत पुन्हा एकदा स्वछता करण्यात आली.
या मोहिमेत गणेश नाईक, प्रसाद सुतार, समिल नाईक, शिवाजी परब, रोहन राऊळ, सच्चीदानंद राऊळ, शितल नाईक, गार्गी नाईक, संजना मयेकर, प्रकाश कडव, विशाल परब, साईप्रसाद मसगे, अक्षय कविटकर, विजय धामापूरकर, प्रणिता मांडवकर, राहुल मांडवकर, ऋतुजा पटेकर, सानिया कुडतरकर, ऋतुराज सावंत, जे. डी. पाटील, नैतिक मोरजकर आदींनी सहभाग घेतला. या मोहिमेसाठी सुनील धोंड, सच्चीदानंद राऊळ व शंकर कोराणे यांनी झुडपे साफ करण्यासाठी हत्यारे पुरविली. बांदा उपसरपंच जावेद खतीब, सचिन नाईक, जकाप्पा पाटील, निलेश मोरजकर यांनी सहभागी मावळ्यांना नाश्ताची सोय केली.