राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलचे खेळाडू चमकले.! ; श्रुतिका परब, सुशोभन सावंत यांचे उत्तुंग यश.

43

सावंतवाडी : नुकत्याच कोल्हापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत सावंतवाडीच्या मिलाग्रीस हायस्कूलचे खेळाडू कु. श्रुतिका नारायण परब या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच सुशोभन संदीप सावंत या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक मिळविला.
या विद्यार्थ्यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रीचर्ड सालदान्हा यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचेही अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.