देवगड : विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ यांच्या वतीने नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने किल्ले विजयदुर्ग येथे दीपोत्सव 2024 के आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3.30 वाजता विजयदुर्ग पंचक्रोशीतील विजयदुर्ग, रामेश्वर, गिर्येे या तीनही ग्रामपंचायत, ग्रामस्थांसह पडेल, मोंड, नाडण, वाडा, वाघोटण, सडेवाघोटण, सौंदाळे, तिर्लोट येथील शिवप्रेमी मिळून, छत्रपती शिवरायांची ढोल-ताशांच्या गजरात, ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा जपत पालखी मिरवणूक, 50 मशाली, 5 हजार पणत्यांसह साजरा होणारा आहे.
भव्य-दिव्य विजयदुर्ग किल्ला दीपोत्सव कार्यक्रम विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ (रजि.) विजयदुर्ग गेली ४ वर्षे विजयदुर्ग किल्ला दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करीत छत्रपती शिवराय, स्वराज्यांच्या मावळ्यांना व सैनिकांना मानवंदना देणार आहोत.
यावेळी शिवकालीन युध्दकलेची आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके- दिल्लीत सादरीकरण झालेले व संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक असलेले सव्यसाचि गुरुकुलम – कोल्हापूर तसेच सागरी सीमा मंच कोकण प्रांतच्या वतीने, शिवकालीन शिडाच्या बोटी दीपोत्सवच्या दिवशी किल्ले विजयदुर्ग येथे येऊन छत्रपती शिवराय, मावळे आणि सैनिकांना मानवंदना देत शिवकालीन आरमाराचे स्वरूप दाखविण्यात येणार आहे . आपणही या दीपोत्सव सोहळ्यात सहभागी होत या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे.असे आवाहन विजयदुर्ग ग्रामविकास मंडळच्या वतीने करण्यात आले आहे.





