कणकवली : बिडवाडी शैक्षणिक संस्था संचलित, बिडवाडी हायस्कूल बिडवाडी यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘आधुनिक शेती तंत्रज्ञान – योग्य की अयोग्य.?’ या विषयावरील वादविवाद स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतील उच्च माध्यमिक विभागातील कुमारी सानिका काळसेकर (इ.११ वी सायन्स) व कुमारी सोनिया जाधव (इ.१२ वी वाणिज्य) यांनी सहभाग घेऊन तृतीय क्रमांक पटकावला. या यशस्वी विद्यार्थ्यांचे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्री. सतीश सावंत, उपाध्यक्ष पी. डी. सावंत, सरचिटणीस शिवाजी सावंत, चेअरमन आर. एच. सावंत, सर्व संचालक मंडळ, शालेय व्यवस्थापन मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.





