सिंधुदुर्गनगरी : अल्पसंख्याकांना दिली जाणारी भेदभाव वागणूक, शैक्षणिक असमानता इत्यादी मुद्द्यावर सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे ‘अल्पसंख्यांक हक्क दिना’निमित्त व्याख्यान पार पडले. सिंधुदुर्गनगरी येथे आध्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार स्मारक भवन येथे अल्पसंख्यांक दिन पार पडला. शासनाच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती प्रा. हुमायूं मुरसल, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, मुराद नाईक, अशपाक शेख, ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी व्हिक्टर डॉन्टस, जैन समाजाचे प्रतिनिधी डॉ. दीपक तुपकर, बौद्ध धर्माचे प्रतिनिधी सूर्यकांत कदम आदींसह मान्यवर उपस्थित होते.

त्यांनी यावेळी आपल्या शुभेच्छा दिल्या व अल्पसंख्यांकांना दिले जाणारे भेदभाव, वागणूक, शैक्षणिक असमानता, धार्मिक असमानता इत्यादी मुद्द्यावर वेगवेगळ्या वक्त्यांनी व्याख्याने दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. रईस पटेल यांनी केले. या कार्यक्रमाला निसार शेख, निसार काजी, शहाणबाज शहा, डॉ. अस्मा ठाकूर, रफीक मेमन, शेरफुद्दीन बोबडे, श्री. गवस, श्री. पाटणकर, सूर्यकांत कदम, नाईक समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पवार तर आभार मुराद अली शेख यांनी केले.





