देवगड : श्री संत गाडगे महाराज परिट समाज सेवा संघ देवगड यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय देवगड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. श्री संत गाडगे महाराज परिट समाज सेवा संघ देवगड यांच्या वतीने आज वार शनिवार दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता देवगड जामसंडे नगरपंचायत यांचे सहकार्याने ग्रामीण रुग्णालय देवगड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात ग्रामीण रुग्णालय देवगडच्या संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली.
सदर अभियानात संस्थेचे अध्यक्ष विजय महादेव पाटील, उपाध्यक्ष वसंत मोहिते, सहसचिव शरद लाड, खजिनदार श्रीमती वैशाली हडकर, देवगड – जामसंडे नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा श्रीमती सावंत मॅडम तसेच ग्रामीण रुग्णालय देवगडचे वैद्यकीय अधिकारी त्याचप्रमाणे संस्थेचे संचालक वसंत शाहाकार, राजेंद्र वालकर, सौ. निलिमा वालकर, गणेश कुणकेश्वरकर व संजय दळवी, संतोष दळवी उपस्थित होते. या अभियानास देवगड – जामसंडे नगरपंचायतच्या कर्मचारी वर्गाचे विशेष सहकार्य लाभले.





